माझं गाव माझं तीर्थ
आपण सर्वांनी खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. ★आपली गावे समग्र विकासात मागे का राहत आहेत ? ★आपण गावाचा विकास होण्यासाठी कोणते प्रयत्न करतो? ★गावाचा विकास करण्यासाठी फक्त शासकीय योजनावर अवलंबून राहणे आवश्यक आहे काय ? ★आपण सर्व ग्रामवासी मिळून काही करू शकत नाही का ? आपण काय करावे ? "रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी "माझं गावच माझं तीर्थ" समजून श्रम,वेळ, कौशल, बुध्दी व वित्त या पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे . "आपण गावाचं देणं लागतो" या भावनेने प्रेरित होऊन गावखेड्याची तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उत्साहाने समाज कार्यात सहभागी होऊ लागली तर गावाचे समग्र परिवर्तन शक्य आहे. ★आपण सर्वांनी मिळून गावाचे ऋण फेडण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले तर आपले गाव आदर्श होण्यास वेळ लागणार नाही ; ★आवश्यकता आहे ती फक्त सर्वांच्या इच्छाशक्तीची. ★सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकच संकल्प करणे आवश्यक आहे की, मला माझं...