माझं गाव माझं तीर्थ
आपण सर्वांनी खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
★आपली गावे समग्र विकासात मागे का राहत आहेत ?
★आपण गावाचा विकास होण्यासाठी कोणते प्रयत्न करतो?
★गावाचा विकास करण्यासाठी फक्त शासकीय योजनावर अवलंबून राहणे आवश्यक आहे काय ?
★आपण सर्व ग्रामवासी मिळून काही करू शकत नाही का ?
आपण काय करावे ?
"रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी "माझं गावच माझं तीर्थ" समजून श्रम,वेळ, कौशल, बुध्दी व वित्त या पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे .
"आपण गावाचं देणं लागतो" या भावनेने प्रेरित होऊन गावखेड्याची तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उत्साहाने समाज कार्यात सहभागी होऊ लागली तर गावाचे समग्र परिवर्तन शक्य आहे.
★आपण सर्वांनी मिळून गावाचे ऋण फेडण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले तर आपले गाव आदर्श होण्यास वेळ लागणार नाही ;
★आवश्यकता आहे ती फक्त सर्वांच्या इच्छाशक्तीची.
★सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकच संकल्प करणे आवश्यक आहे की, मला माझं गाव जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवेल असे बनवायचे आहे.
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र।
सज्जनांनी व्हावे एकत्र ।।
संघटना हेची शक्तीचे सुत्र।
ग्रामराज्य निर्माण करी ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून ग्रामसुधारणेचा मूलमंत्र दिला आहे. सज्जनांनी एकत्र येऊन गावासाठी काम केले पाहिजे. संघटनेमध्ये शक्ती असून लोकसहभागातून ग्रामराज्य निर्माण करता येते. हिवरेबाजार ,पाटोदा, राळेगणसिद्धी ही गावे लोकसहभागातूनच समृद्ध झाली आहेत. आपले गाव सुध्दा समृद्ध होईल.
आम्ही सर्व ग्रामविकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी ग्रामविकासदूत म्हणून नेहमी आपल्या सोबत आहोत.
सर्वांना नम्र आवाहन करतो की, आपण गाव विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावे कारण सर्वांच्या सहभागाशिवाय गाव समृद्ध होणार नाही.
चला तर मग सर्वजण निर्धार करू!
आपले गाव समृद्ध करू!!
©ओमप्रकाश मं यादव
#माझं गाव माझं तीर्थ अभियान संकल्पक
तथा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं)
जिल्हा परिषद , परभणी
भाई आपण केलेल्या उपक्रम हे कौतुकास्पद आहे निश्चितच तुमच्या मूळे, तुमच्या व रामपुरी कराचे सर्व श्रेत्राचे याच अभिमानास्पद आहे
ReplyDeleteयाचे तुमि शिरोमणी आहेत।
तुमि आमचा चेहरा आहेत।
माझे मत आहे की आपण थोडा कृषी उत्पन्न हवर गावाच्या प्रगती साठी प्रयत्न करावा ।
ओम भाऊ खरच आम्हाला आभिमान वाटतो तुमचा, तुमच्या कार्याचा, तुमच्या इच्छाशक्तीचा खरंच तुमच्याकडे पाहून आम्हाला एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. थकवा हा नसतोच याची जाणीव आम्हाला तुमच्याकडे पाहून होते, कामाची सुरुवात करणे सोप असत पण ते काम सर्वांना सोबत घेऊन पूर्णत्वाकडे घेऊन जाण खूप अवघड असत त्यासाठी महत्वाचं म्हणजे वेळ, सय्यम, मेहनत आणि सर्वांना सोबत घेऊन चालन खूप गरजेचं असत ह्या सर्व गोष्टी तुमच्यात आहेत. खरंच proud of you ओम भाऊ
Delete