माती आडवा पाणी जिरवा च्या माध्यमातून कडवंची झाले समृद्ध
कडवंची हे गाव जालना शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 455 कुटुंब व 3000 लोकसंख्या असलेले गाव आहे. कडवंची गावाची एकूण क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ 1807 हेक्टर एवढे असून लागवडी योग्य क्षेत्र सुमारे 1400 हेक्टर आहे.1995 पूर्वी म्हणजे फक्त 167 हेक्टर क्षेत्र( 13 टक्के) बागायती होते. कडवंची गाव अवर्षण प्रवण क्षेत्रात असून वार्षिक सरासरी पाऊस सुमारे 450 मिलिमीटर एवढा पडतो. 1995 पूर्वी या गावातील 400 ते 500 लोक ऊस तोडण्यासाठी बाहेर जात असत. दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी शासकीय दौऱ्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र जालना यांचे पाणलोट क्षेत्र विकास मॉडेल कडवंची या गावी भेट देण्याचा योग आला. यावर एकच उपाय होता तो म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास. श्री विजय अण्णा बोराडे यांच्या दूरदृष्टीतून, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या पुढाकारातून व नाबार्डच्या अर्थसहाय्याने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये माथा ते पायथा अशाप्रकारे काम करण्यात आले, असे श्री. वासरे कृषी अभियंता तथा प्रकल्प संचालक कडवंची यांनी सांगितले. कडवंची येथील जलसंधारणाचे वैशिष्ट्य म्हणजे माती...