प्रतिभावंताच्या प्रदेशात - राजा पुजारी
क्षितीजाला पंखाच्या कवेत घेणारा अवलिया अधिकारी
अधिकारी पद मिळणं किंवा मिळवणं एवढं सोपं काम नाही परिश्रमाच आणि मेहनतीचं, कार्याच आणि कर्तृत्वाचं मोल त्यासाठी द्यावं लागतं. अत्यंत जीवघेण्या स्पर्धेच्या लोकसेवा आयोगाच्या अग्नि परीक्षेतून तावून सुलाखून निघाव लागतं. तेव्हा तो अधिकारपदाच्या शिखरावर विराजमान होतो. एकदा ध्येय साध्य झाले म्हणजे प्रवास संपत नाही. आता तर त्याच्या कार्याचा श्रीगणेशा झालेला असतो. आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा, कार्यशैलीचा, सर्वसमावेशकतेचा, क्षिरनिर विवेकाचा अवलंब करून निर्णय घेण्याचा, प्रशासनातील विविध कौशल्याचा व आपल्या अधिकार पदाचा सर्वसामान्यांच्या भल्यासाठी उपयोग करावा लागतो. तेव्हा जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवता येते. आणि मग असा अधिकारी जनतेच्या मनातील ताईत बनतो. या सर्व परीक्षेत पारंगत असणाऱ्या आणि आपल्या पंखांनी क्षितिज कवेत घेणाऱ्या अवलिया अधिकाऱ्यांमध्ये परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांचा उल्लेख करावा लागेल.
![]() |
ओमप्रकाश मं. यादव ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद, परभणी. |
सत्तेची खुर्ची जशी काटेरी असते, तसेच अधिकारपदाची खुर्चीही काटेरी असते. त्यामुळे त्यावर मांड कशी बसवायची हे त्या-त्या अधिकाऱ्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे. शासन आणि प्रशासन या दोन चाकावर शासकीय यंत्रणेची मदार असते. भारताने लोकशाही शासन प्रणालीचा अवलंब केल्यामुळे लोकप्रतिनिधी असलेले पदाधिकाऱ्यांनी विविध जनहिताचे निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करायची असा घटनेने घालून दिलेला नियम आहे. जोपर्यंत पदाधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. पण पदाचा दुरुपयोग होऊ लागल्यावर चुकीच्या निर्णयाला पाठिशी न घालता जो सडेतोड भूमिका घेतो असे अधिकारी पदाधिकाऱ्यांना सतत खुपतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर दबाव आणणे, अविश्वास आणणे, मंत्रालयातून अशा अधिकाऱ्याची उचलबांगडी करणे हे खेळ पदाधिकारी करतात. त्यामुळे बहुतेक अधिकारी पदाधिकार्यांशी तडजोड करून आपले स्वतःचे हात छाटत त्यांना मदत करतात. आणि खरी वेळ आली तर पदाधिकारी काखावर करून अधिकाऱ्याला त्यात गुंतवतात. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काटे असतात असे मी म्हटले आहे. काही अधिकारी मात्र या कुठल्याही गोष्टीचा अवलंब न करता आपल्या नाकाच्या नीट सरळ चालतात. पदाधिकारी व इतरांकडून कोणती अपेक्षा बाळगत नाहीत अशा अधिकाऱ्याच्या कार्यकुशलतेचा ठसा जनमनावर उमटतो. सातत्याने आपल्या कामात व्यस्त राहून केवळ आपल्या पदांपुरतेच काम न करता इतरही सामाजिक दायित्व ज्यांच्या नसानसात भिनलेले असते अशा अधिकाऱ्यांमध्ये ओमप्रकाश यादव यांचा फार वरचा नंबर आहे. आणि त्यामुळेच अशा अधिकाऱ्याबाबत दोन शब्द लिहून आपली लेखणी झिजवावी असा आमचा मानस निर्माण झाला.संत साहित्याचे गाढे अभ्यासक व प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश मंचकराव यादव यांची परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेली रामपुरी ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे. सामान्य पण अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या यादव कुटुंबात ओमप्रकाशजीचा जन्म झाला रामपुरी हे गोदेच्या काठावर असलेले टुमदार गाव या रामपुरीला बारा हनुमंताची रामपुरी असे म्हणतात गावोगाव शक्तीची देवता हनुमानाचे एक मंदिर असते पण इथे मात्र बारा हनुमंताची मंदिरे आहेत त्यामुळे रामपुरी हे अध्यात्मिक ऊर्जा तीर्थ आहे गोदेच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या काळ्या कसदार मातीत ओमप्रकाशजीचा पिंड पोसला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले पण अशाही परिस्थितीत विचारांची उंची आणि प्रगल्भता मोठी होती. आपण डॉक्टर व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती पण एक-दोन गुणांनी धोका दिला आणि वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले पण हनुमंताची ऊर्जा घेऊन त्यांनी त्यानंतर परभणीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश मिळवला व आपल्या अभ्यासाच्या छंदाने एम एस सी ऍग्री या पदव्युत्तर अभ्यासक्रमात गोल्ड मेडल हस्तगत केले त्यानंतर ते कृषी सहाय्यक म्हणून नोकरीला लागले सोनपेठ येथे कृषी सहाय्यक पदावर काम करताना त्यांचे मन रमेना त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि यश मिळवले पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना निवडण्यात आले तब्बल सहा वर्ष या पदावर मुंबई पुणे आणि इतर शहरांमध्ये काम केले पण येथेही मन रमेना तेव्हा त्यांनी पुन्हा लोकसेवा आयोगाचे दरवाजे ठोठावले व या परीक्षेत यश मिळवून ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. पहिल्याप्रथम जिल्हा परिषद चंद्रपूर येथे त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचा पदभार मिळाला येथे त्यांना आदिवासी पाड्यातील व इतर गरीबीत जीवन कंठनाऱ्या लोकांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली ते याबाबत सांगतात की चंद्रपूर मध्ये विविध माणसाकडून खूप चांगले अनुभव अनुभूती मिळाली त्यानंतर ते सध्या परभणी जिल्हा परिषद मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ओमप्रकाश यादव हे केवळ एका अधिकारी नाहीत तर संत साहित्यातील ही अधिकारी पुरुष आहेत त्यांनी चंद्रपूर येथे असतानाच संताचे समाज प्रबोधन हा ग्रंथ लिहिला संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज व संत कबीर यांच्या समाज प्रबोधन पर अभंगाचा दो ह्याचा व विचाराचा त्यांनी समग्र अभ्यास करून या ग्रंथाची निर्मिती केली आहे त्यांनी यातील महान संतांच्या मधुर वाणीतून प्रकट झालेल्या समाज प्रबोधन पर अभंगावर दोहयावर मार्मिक भाष्य केले आहे त्यांची निवड ही त्यांच्या विचारांची प्रचीती आणून देते संत साहित्य हेच समाज प्रबोधन करण्यास समर्थ आहे हे त्रिकालाबाधित सत्य त्यांनी या ग्रंथातून मांडले आहे प्रत्येक माणसाचे विचार त्याच्या विचारातून आणि कृतीतून प्रतीत होत असतात ओम प्रकाश यादव यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्याप्रथम ग्रंथ लिहिण्यासाठी समाज प्रबोधन विषय हाती घ्यावा यामागे निश्चितच त्यांच्या आंतरिक मनाचा सुगंध प्रकटल्या शिवाय राहत नाही म्हणूनच केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहणे हे समाजावर अन्याय करणारे ठरेल तर ते एक प्रगल्भ विचाराचे आपल्या अधिकाराचा आणि पदाचा वापर समाजाच्या हितासाठी करणारे अधिकारी आहेत आपण अधिकारी झाल्यावर केवळ ऐषारामात जीवन जगणे एवढेच ध्येय न ठेवता ओमप्रकाश यादव यांनी सातत्याने आपण ज्या गावात जन्माला आलो त्या गावाची देणे लागतो त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे देणे लागतो याची जाणीव जिवंत ठेवली आहे म्हणूनच अधिकार पदावर असूनही ते गावाची काळजी घेतात गावातले तरुण लोकसेवा आयोग आणि इतर परीक्षेमध्ये पुढे जावेत यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.
एवढेच नव्हे तर ग्लोबल वार्मिंग जागतिक पर्यावरण प्रदूषण यावर उपाय म्हणून वृक्ष लागवडीला विशेष महत्त्व आहे ओमप्रकाश यादव यांनी लोकसहभागातून रामपूरी येथे गोदा काठावर गावात आणि रस्त्याच्या कडेला 7000 झाडांची लागवड केली. या वृक्षाला विचारवंत ,संत, शास्त्रज्ञ महापुरुष यांची नावे दिली व गावातील लावलेल्या झाडांचे पालकत्व त्याच्या शेजारच्या कुटुंबाकडे दिले.त्यामुळे झाडांचे पोषण चांगले झाले एवढेच नव्हे तर गोदा काठावर वृक्ष लागवडी सोबतच नयनरम्य बगीच्या उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मशानभूमीत वृक्ष लागवड करून अधिक सुशोभित करण्याचा त्यांचा विचार आहे. भल्याभल्यांना रामपुरी हे हनुमंताची नगरी म्हणून जसे आकर्षित करते तशी ती वृक्ष लागवड आणि सुशोभिकरणाने आकर्षित करणारी ठरावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. समाज विकासाचा आणि प्रबोधनाचा हा वारसा त्यांच्या ग्रंथावरून जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ते सातत्याने आपल्या प्रशासकीय सेवेत मग्न असतात. चांगल्या माणसांचा शोध आणि बोध हा त्यांच्या आवडता विषय आहे. स्वतः चांगल असल्याशिवाय इतरातलं चांगलं दिसत नाही हे सत्य असेल तर निश्चितच ओमप्रकाश यादव हे एक चांगले माणूस व चांगले अधिकारी आहेत असे म्हणण्याशिवाय प्रत्यवाय नाही. अशा या विचारवंत अधिकाऱ्याला आमचा सलाम त्यांच्या हातून भविष्यातही सत्कार्य घडत रहावे जनतेची सेवा घडत राहिल अशी अपेक्षा करून या छोटेखानी लेखाला पूर्णविराम देतो.
प्रतिभावंताच्या प्रदेशात
राजा पुजारी, परभणी


Proud to b friend
ReplyDeleteRealy nice person
Just better than projected here
Yet waiting for his best
We are proudly feel and happy to be got honest and work holic person for our Parbhani district
ReplyDeleteThanking you sir
अत्यंत प्रतिभाशाली,जागरुक व संवेदनाशील अधिकारी.
ReplyDeleteतसेच सर Techno person सुद्धा आहे. त्यांनी स्वतः अँप तयार केलेला आहे. सदर अँप मुळे नागरिकांना, विध्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शासनाची माहिती, शा. नि. व योजनांची माहिती दिलेली आहे.
ReplyDeleteखूप कमी अधिकारी पैकी ते एक अधिकारी आहे. कोणतेही काम मनातून करणारे अधिकारी आहेत. सरानं कडून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
ReplyDeleteओमभाऊ आपल्या कार्याला सलाम..
ReplyDeleteSalute ur work saheb. Very great work .
ReplyDelete