रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे
रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे ............................................... लोकांना शहाणं करतोय म्हणून पोपटपंची करणाऱ्यांची संख्या समाजात अफाट आहे. वेगळ्या पातळीवर हा ही पोटापाण्याचा धंदाच! स्वत: प्रत्यक्ष काहीच कृती न करता,इतरांनी काय करावं,असं सांगणाऱ्या व्यक्तींपासून मी चार हात दूर राहातो.त्यातही हायफाय समाजसेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांशी संपर्क होऊ नये याची काळजी घेतो.पत्रकार म्हणून असे अनेक भंपक लोक मी बघितलेत.त्यामुळं ओमप्रकाश यादव यांचा मला पहिल्यांदा व्हाट्सएप संदेश आला तेव्हा मी त्याला कोरडेपणाने प्रतिसाद दिला. याचं कारण त्यांच्या मागे जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ हे पद होतं. पण दुसऱ्या एका मित्राने कळवलं की,त्यांनी त्यांच्या गावात खूप चांगलं काम केलयं.हजारो झाडं लावून जोपासलीत.मग मी त्यांना रुद्रा हटला यायचं निमंत्रण दिलं.सहकुटुंब आले.त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की,हे माझ्याच जातकुळीतील आहेत. भरपूर काम करून,सकारात्मक प्रसिद्धी करणाऱ्यांपैकी एक आहेत.त्या भेटीत छान चर्चा झाली. जाताना त्यांनी रामपुरी(बु.)या त्यांच्या गावी ...